GALLERY
बालिकांना जगण्याचा हक्क द्याया.
ज्यांनी शिक्षणाची पेटवली क्रांतीज्योती,
ज्यांनी घडवली स्त्रियांची प्रगती.
अशा थोर समाज सुधारक, अद्यशिक्षिका, कवयित्री व भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, शिक्षणाच्या महामेरु, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…..
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.डी. डी. विसपुते डी.एड. कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री धनराजजी विसपुते सर यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
” बालिका दिन ” हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
प्रथम ऑनलाईन पद्धतीने दीपप्रज्वलन करण्यात आले.तसेच मान्यवरांचा परिचय व स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अध्यापिका सौ. निर्मला पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
प्रस्तुत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच कविता वाचनातून त्यांना मानवंदना दिली. काही विद्यार्थ्यांनी वेशभूषेतून सावित्रीबाई फुले साकारली. ‘मी सावित्री बोलतेय’ ह्या एकपात्री नाटकातील काही प्रसंग विद्यार्थ्यांनी सादर केले. अध्यापिका सौ.नीता निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका रिमा अधिकारी यांनी केले
तर शीतल खोत या विद्यार्थिनीने कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.