क्षेत्र भेट-युसुफ मेहेरअली सेंटर, मु . तारा पो. बारापाडा ता.पनवेल जिल्हा रायगड

क्षेत्र भेट-युसुफ मेहेरअली सेंटर, मु . तारा पो. बारापाडा ता.पनवेल जिल्हा रायगड

युसुफ मेहेरअली सेंटर, मु . तारा पो. बारापाडा ता.पनवेल जिल्हा रायगड येथे दिनांक 23 मार्च 2023 रोजी आदर्श समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते सर यांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाने श्री. डि.डी.विसपुते अध्यापक विद्यालयातील छात्रध्यापकांची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.
या क्षेत्रभेटीमध्ये तेल गिरणी,सुवासिक साबण निर्मिती विभाग, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे( सुतार काम विभाग ) माती काम विभाग,. डेअरी विभाग व गांडूळ खत निर्मिती विभाग, बापू कुटी या सर्व विभागामधून छात्राध्यापकांना प्रत्यक्ष कृती मधून अनुभूती देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचे यशस्वीरीत्या प्रात्यक्षिकांचा भाग समजावून देण्यात आला. सामाजिक व वैकासिक कौशल्याधरीत शिक्षणाची जाणीव करून देण्यात आली.तसेच मानव मित्र देविदास सरांनी युसुफ मेहेर अली सेंटर विषयी माहिती दिली.
या क्षेत्र भेटीसाठी प्रथम व द्वितीय वर्षाचे एकूण ६३ विद्यार्थी व सर्व शिक्षक सहभागी झाले होते .

महिला दिनानिमित्त “सन्मान ती चा

महिला दिनानिमित्त “सन्मान ती चा

आदर्श महिला मंडळ व सुवर्ण सखी महिला मंडळ , नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त दि- ११/०३/२०२३ रोजी संध्या. ४.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, संचालिका मा. सौ. संगिता विसपुते,मा. सौ.अर्चनाताई परेश ठाकूर,मा.सौ.किरण ताई दंडगव्हाळ, मा. सौ. वंदनाताई गुळवे, मा. सौ. आदितीताई सोनार,डॉ. जयश्री पाटील, मंगला चौधरी, वर्षा विभांडिक तसेच सर्व विभागांचे महिला प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.