GALLERY
उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला
आपल्या सर्वांना ७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आदर्श शैक्षणिक समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आदर्श समुहाचे चेअरमन मान. श्री धनराजजी विसपुते सर, संचालिका मान. सौ.संगीता विसपुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने , ज्येष्ठ शिक्षण तज्ञ मा.श्री.प्रकाश हरी दलाल सर. तसेच मा. डॉ. प्रकाश बाविस्कर सर माजी उपप्राचार्य , चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आज सकाळी 7 वाजता मुख्य कार्यालय नवीन पनवेल येथे सन्माननीय प्रकाश बाविस्कर सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सकाळी 7.30 वाजता देवद – विचुंबे येथील शैक्षणिक संकुलामध्ये प्रमुख अतिथी मा.श्री.प्रकाश हरी दलाल सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले संविधानाचे वाचन व ध्वज प्रतिज्ञा घेण्यात आली. राष्ट्रगीत ,ध्वजगीत व देशभक्तीपर गीतांमुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. प्रमुख अतिथी मा.श्री.प्रकाश हरी दलाल सर व मा. डॉ. प्रकाश बाविस्कर सर यांनी प्रजासत्ताक दिनाच्याशुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले . तसेच बी.एड कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री. धनराजजी विसपुते सर यांनी अध्यक्षीय भाषणात मौलिक मार्गदर्शन केले .यावेळी सर्व विभागाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या या उत्साहवर्धक व स्फूर्तीदायक दिनी भारत माता की जय, ,भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !या जयघोषाने सारे आसमंत दुमदुमून गेले.