एक दिवशीय वेंन्टल कार्यशाळा संपन्न 2021
HomeCollege Events Galleryएक दिवशीय वेंन्टल कार्यशाळा संपन्न 2021

GALLERY

“एक दिवशीय वेंन्टल कार्यशाळा संपन्न”

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
श्री.डी. डी. विसपुते डी.एड. कॉलेजमध्ये भारत सरकार वेंन्टल कार्यशाळा दिनांक 23 ऑगस्ट 2021रोजी 1:00 ते 2:00 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
VENTEL- Vocational Education Nai Talim Experiential Learning म्हणजेच
व्यावसायिक शिक्षण नई तालीम अनुभवात्मक अध्ययन.
१९३७मध्ये वर्धा शिक्षण परिषदेत गांधीजींनी बुनियादी शिक्षणाचा विचार देशासमोर मांडला. त्यांची ‘नई तालीम’ शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीचे ध्येय बाळगणारी आहे. मन, बुद्धी, शरीर यांच्यात संतुलित आणि सुसंवादित्व साधणारी जीवनकेंद्री शिक्षणपद्धती आहे.
ज्ञानग्रहणाच्या निसर्ग, समाज आणि उद्योग या माध्यमांचा अध्ययनकरीत विचारशील, चिकित्सक, नैतिक, निर्भय, परिश्रमी, सहयोगी, सहिष्णू, संयमी अशा व्यक्तित्वाची जडणघडण होणे ‘नई तालीम’मध्ये अपेक्षित आहे.
प्रस्तुत कार्यशाळेत मा. जया कपाले, साधन व्यक्ती,एमजीएनसीआरई. शिक्षण मंत्रालय यांनी मार्गदर्शन केले.
प्रथम माननिय जया मॅडम यांनी
पी.पी. टी.द्वारे कार्यशाळेची गरज काय आहे, VENTEL म्हणजे काय? स्वतःहा आत्मनिर्भर बनण्यासाठी छोटे व्यवसाय किती उपलब्ध आहेत, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौशल्य लक्षात घेऊन त्यांना कसे मार्गदर्शन करावे, नविन शिक्षण पद्धतीमध्ये Vocational Subject का समाविष्ट करण्यात आला आहे?, या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे, गांधीजींचे स्वप्न आपल्याला पूर्ण करावयाचे आहे यामध्ये विद्यार्थ्यांचा अंधकार दूर करणारे शिक्षकच असतात, हे ही सांगायला त्या विसरल्या नाहीत.
सोफिया शेख या छात्राधिपेकेने विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या शेवटी डी.एड. कॉलेज च्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांनी, नेहमीच माझे शिक्षक व विद्यार्थी यांना तुमच्याबरोबर काम करायला आवडेल असे सांगत सरकारी स्तरावर विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्टित शिक्षणावर मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेच्या वतीने जया मॅडमचे आभार मानले.