वन सप्ताह
HomeCollege Events Galleryवन सप्ताह

GALLERY

🌳🌲आदर्श शैक्षणिक समूहाच्या श्री डी. डी. विसपुते डी. एड. कॉलेज मध्ये वन सप्ताह साजरा…….🌿🌲 “झाडे लावा झाडे जगवा मंत्र जपुया निसर्गाचा वृक्षांगण खुलेेल धरतीचे गौरव करू या धरती मातेचा” आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व सेक्रेटरी मा.सौ.संगिता विसपुते यांच्या प्रेरणेने व डीएड कॉलेजच्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत वन सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाची सुरूवात 1जूलै रोजी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री . धनराजजी विसपुते व संस्थेच्या सचिव श्रीमती संगीता विसपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शैक्षणिक समुहामध्ये 100 झाडे लावून करण्यात आली. सामाजिक भान व पर्यावरणाप्रति जनजागृती हा उद्देश समोर ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले् आदर्श शैक्षणिक समूह, न्यू पनवेलआणि परिसर आशा यांच्या संयुक्त विद्यमाने ” वनसंवर्धन सप्ताह आणि गुरुपौर्णिमा ” यांचे औचित्य साधून जनजागृतीसाठी INTERACTIVE WEBINAR …. “पर्यावरण माझा गुरु” – चे आयोजन दिनांक 5 जूलै रोजी करण्यात आले. वन सप्ताहानिमित्त क्विझ कॉम्पिटिशन तसेच पर्यावरणावरील स्लोगन कॉम्पिटिशन ऑनलाईन घेण्यात आली. या स्पर्धेला पूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला. डी.एडच्या सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरी एक एक रोप लावून पर्यावरणाविषयी जनजागृती व जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला. वृक्षारोपण, वन संवर्धन व पर्यावरण संरक्षणाची जाणीव लक्षात घेऊन वन सप्ताह संपन्न झाला.