वाचन प्रेरणा दिन 2021
HomeCollege Events Galleryवाचन प्रेरणा दिन 2021

GALLERY

ग्रंथ हे आपले गुरू,
वाचनासाठी हाथी धरु,.
वाचनाला देऊ आकार,
कलामांचे स्वप्न करू साकार.📚

विद्यार्थी प्रिय शिक्षक, आपल्या देशाचे 11 वे राष्ट्रपती, पद्मभुषण, पद्मविभुषण व भारतरत्नाने सन्मानित खऱ्या अर्थाने भारत मातेचे रत्न आदरणीय डाॅ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन.
आदर्श शिक्षण समुहाचे, श्री.डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालय येथे मा.श्री.विसपुते सरांच्या प्रेरणेने ,वाचन प्रेरणा दिन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस शब्दसुमनांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. त्यांनतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. अध्यापिका सौ. सुनिता माळाळे यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून कार्यक्रमाची रूपरेषा व उद्दीष्टे स्पष्ट केली.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनपट व्हिडिओ व्दारे सादर करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती सादर केली तसेच त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे विद्यार्थ्यांनी वाचन केले. अध्यापिका सौ.नीता निंबाळकर यांनी वाचनाचे महत्व सांगत निरिक्षण म्हणजे एक प्रकारचे वाचनच असते, असे सांगितले.
मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे मँडम यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे. अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. म्हणूनच वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. त्यांनी आठवड्यातील एक तास अवांतर वाचन करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
राणू सिंग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री. शिवाजी डोंगरदिवे यांनी कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.