Vachan Prerana Din 2019
HomeCollege Events GalleryVachan Prerana Din 2019

GALLERY

विद्यार्थ्यांना अग्निपंख देणारे आणि वाचनाची संजीवक दीक्षा देणारे भारताचे 11वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो तसाच वाचन प्रेरणा दिन म्हणूनही साजरा केला जातो. दि.15 आॅक्टोबर 2019 रोजी आदर्श शिक्षण समुहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते सरांच्या प्रेरणेने, डी.एड.विभागाच्या मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे आणि नर्सि॑ग कॉलेजच्या जेष्ठ प्राध्यापिका मिनल गुरसुळे यांनी सरस्वती आणि डॉ कलाम यांच्या प्रतिमांना कुसुमांजली अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. नर्सिगच्या प्राध्यापिका प्रा. प्रज्ञा भगत प्रास्ताविक केले. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी काव्य-शायरी-चारोळी-कथा-लेख आदी साहित्य-आयामांचे वाचन केले. मोबाईल फोनच्या अतिवापराचे दुष्परिणामपासून डॉ आनंदी गोपाळ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, गौतम बुद्धापर्यंत, विस्तिर्ण अवकाश विद्यार्थ्यांच्या वाचनाने व्यापला. प्रा. उन्मेष गद्रे यांनी ‘अभिवाचन’ या नव्या वाचन दालनाचा परिचय करून दिला आणि त्यानंतर ध्वनिफितीद्वारे अभिवाचनाची नितांत सुंदर अनुभूती विद्यार्थ्यांना मिळाली. ग्रंथपाल श्रीमती पडवळ यांनी वाचनापासून दुरावणा-या युवापिढीमुळे ग्रंथपालांच्या व्यथा मांडल्याच परंतु युवकांना वाचनाचे नवे पर्याय सांगून प्रेरित केले. प्रा उन्मेष गद्रे यांनी पुस्तक भिशीची संकल्पना मांडली आणि संकल्प करण्यास प्रोत्साहित केले. या.प्राचार्या श्रीमती मधाळे मॅडमनी कार्यक्रमाच्या संयोजन समितीचे ग्रंथपाल सदस्य, त्यांचे कार्यालयीन सहकारी, सूत्रसंचालक सुसंवादिनी श्रीमती मनीषा तोडेकर आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचनसंस्कृती आणि वाचन संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले आणि ग्रंथालयास डी.एड. विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी मराठी माध्यमाची 19 पाठ्यपुस्तके देणगी म्हणून दिली. त्यांचेच वर्गमित्र मान. श्री.प्रीतमसर यांनी मान.श्री. माळी यांनी संकलित केलेले ‘प्रेरणा’ शीर्षकाचे पुस्तक देणगीदाखल दिल्याची घोषणा केली. सदर कार्यक्रमाने प्रेरित होऊन कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक सुसंवादिनी श्रीमती मनीषा तोडेकर यांनी मुलाच्या वाढदिवसाप्रित्यर्थ ग्रंथालयास रु.500.00 ची देणगी जाहीर केली. ग्रंथपाल श्री.पगारे यांनी स्वरचित कवितेचे वाचन करून आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे संयोजन, आरेखन, आलेखन, सूत्रसंचालन आणि सादरीकरण ग्रंथपाल, कार्यालयीन कर्मचारी आणि अन्य सहाय्यक यांनी केले होते.