Sports Competition & Prize Distribution
HomeCollege Events GallerySports Competition & Prize Distribution

GALLERY

🎯🏏क्रीडास्पर्धा व बक्षीस वितरण संपन्न 🎾🎯

दि.14 डिसेंबर 2019 रोजी
आदर्श शिक्षण समुहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते सरांच्या प्रेरणेने, डी.एड.विभागाच्या मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
क्रीडास्पर्धेच्या सुरवातीला स्पर्धकांनी क्रीडाप्रतिज्ञा घेतली.त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेण्यात आले.
स्पर्धा संपन्न झाल्यानंतर लगेचच विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र, ट्राॅफी व मेडल्स देऊन गौरविण्यात आले.
मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, खेळामुळे आम्हाला आनंद तर मिळालाच पण आमच्या आत्मविश्वासात देखील वाढ झाली अशा भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थीं उपस्थित होते.
क्रीडाशिक्षक शिवाजी डोंगरदिवे व हितेश कडू यांनी परीक्षक म्हणून तर, क्रीडाप्रमुख म्हणून निर्मला पाटील यांनी काम पाहिले