Shri Bapusaheb Vispute 4th Smrutidin
HomeCollege Events GalleryShri Bapusaheb Vispute 4th Smrutidin

GALLERY

तुमच्या कर्तृत्वाची प्रेरणा आजही साथ देत आहे। तुमच्या मायेचे क्षण आजही हृदयात आहे। तुम्ही प्रत्यक्षात नाही पण आशीर्वाद रूपात आहे। आज २२ सप्टेंबर २०१९ “कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती व शिक्षणमहर्षी बापूसाहेब डी.डी. विसपुते उर्फ ऋषीमहाराज यांचा चौथा स्मृतिदिन… शिक्षणमहर्षी बापूसाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पनवेलचे आमदार व सिडको अध्यक्ष मा.प्रशांतजी ठाकूर, प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री मा.श्रीम.मायाजी जाधव, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, ग्रामपंचायत विचुंबेचे विविध पदाधिकारी, विविध शाळांचे शिक्षक यांच्या उपस्थितीत “युवा संवाद व आदर्श माहेर पुरस्कार” वितरण सोहळा संपन्न झाला… कार्यक्रमाच्या प्रारंभी बापूसाहेबांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारी एक चित्रफीत व मा.सुमित्राताईजी महाजन यांच्या शुभहस्ते बापूसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याची चित्रफीत दाखविण्यात आली… कर्मवीर भाऊराव पाटील व बापूसाहेब यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले… प्रस्तुत कार्यक्रमात, डी. एड. विभागाच्या मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांना प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री मा.श्रीम.मायाजी जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेतील विशेष पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला… इंग्रजी माध्यमात विशेष गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या शिक्षिकांना “आदर्श माहेर पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले… या नंतर पनवेलचे आमदार मा.श्री.प्रशांतजी ठाकूर यांनी युवा संवादाच्या माध्यमातून उपस्थित युवकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देली. त्यांनीआदर्श समूहाच्या विविध कार्यक्रमाचे व उपक्रमाचे कौतुक केले. आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी बापूसाहेबांना श्रद्धांजली अर्पण करत उपस्थितांना संबोधित केले