Republic Day 2020
HomeCollege Events GalleryRepublic Day 2020

GALLERY

७१ वा प्रजासत्ताक दिन

“देश विविध रंगांचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा…”
आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व संचालिका मा.सौ.संगिता विसपुते यांच्या प्रेरणेने व डी. एड. विभागाच्या मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श समूहामध्ये मोठ्या उत्साहात ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कारगिल युध्दात ऑपरेशन विजय मध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारे मा.श्री.कॅप्टन संदीप कुमार मेहता यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले… यावेळी ध्वजगीत, राष्ट्रगीत आणि संविधानाचे प्रास्ताविक यामुळे देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले…
सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर करून वातावरणात एक जोश निर्माण केला… कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कॅप्टन संदिप कुमार मेहता यांनी आपल्या अनुभवातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यावेळी त्यांनी सीमेवरील शत्रूपेक्षा देशातील अंतर्गत शत्रूपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. तर आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी सर्वांना देशभक्तीची अनेक उदाहरणे देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर कलाविष्कारास बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

“भारत माता की जय” या घोषणेने कार्यक्रमाची सांगता झाली.