राष्ट्रीय विज्ञान दिन 2022
HomeCollege Events Galleryराष्ट्रीय विज्ञान दिन 2022

GALLERY

चंदशेखर व्यंकट रमण भारतीय भौतिक शास्त्रज्ञ, नोबल पुरस्कार, भारतरत्न आणि लेनिन शांती पुरस्कार प्राप्त असे महान वैज्ञानिक. त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात केलेल्या योगदानामुळे व लावलेल्या वेगवेगळ्या शोधांमुळे आपल्या भारताला व जगाला भविष्यात प्रगती करण्यासाठी कलाटणी मिळाली. 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी सी. व्ही. रमण यांचा ‘रमण इफेक्ट’ हा शोध संपूर्ण जगामध्ये सादर करण्यात आला. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 साजरा करण्यासाठी यावर्षी “शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टिकोन” हा विषय निश्चित केला आहे. कार्यक्रमाचा उद्देश:- विद्यार्थ्यांमध्ये- विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे. -वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. -प्रयोगशीलता व निरीक्षण क्षमता वाढीस लावणे -विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषया संबंधित माहिती व समस्या याबाबत शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री. विसपुते सर यांच्या प्रेरणेने व डी.एड. कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “राष्ट्रीय विज्ञान दिन” हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. प्रथम व्हर्चुअल पद्धतीने दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षांचा परिचय व स्वागत अंकिता गमरे या विद्यार्थ्यीनीने केले. या कार्यक्रमामध्ये प्रश्नमंजुषा हा वैज्ञानिक ओळखण्याचा रॅपिड फायर राउंड घेण्यात आला. त्यानंतर चित्रावरून वैज्ञानिक शब्द तयार करण्याची कोडी घेण्यात आली. विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. समरिन काझी या विद्यार्थिनीने ”रेन वॉटर हार्वेस्टिंग” या प्रयोगाचे सादरीकरण केले. सबा मुजावर हिने हवेचा दाब यावरील प्रयोग सादर केला. निलोफर हिने संत्र्याची साल व फुगा यामध्ये कशी रासायनिक क्रिया घडते हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. इतकेच नव्हे तर या कार्यक्रमात विज्ञानावरील कविता व कोडी सादर करण्यात आली. अध्यापिका सौ. नीता निंबाळकर यांनी आपल्या मनोगतातून विज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात होतो. उत्सुकता व निरीक्षणातून विज्ञानाची प्रगती होते असे मत व्यक्त केले. तसेच उत्तम कार्यक्रम सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका समरिन काझी हिने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समृद्धा मोरे या विद्यार्थीनीने केले. रानू सिंग या छात्राध्यापीकेने उत्तम पीपीटी तयार करून सादरीकरण केले. अपर्णा तवले या विद्यार्थिनीने कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.