राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती
GALLERY
♦️राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी..
दिनांक 2/10/2020 राष्ट्रपिता महात्मा गांधी 151 वी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची 116 वी जयंती निमित्त आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री डी. डी. विसपुते डी.एड. कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री विसपुते सर यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “Covid 19 जनजागृती” हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
प्रस्तुत कार्यक्रमात प्रमुख अतिथी श्री. डी. डी.विसपुते स्कूल नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्या माननिय जया मॅथ्यू मॅडम यांना आमंत्रित करण्यात आले होते.
प्रथम ऑनलाईन पद्धतीने दीपप्रज्वलन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच मान्यवरांचा परिचय व स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली
प्रस्तुत कार्यक्रमात प्रथम “Covid-19 जनजागृती” या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन ऑनलाइन पद्धतीने दाखवण्यात आले या प्रदर्शनासाठी डी.एड इंग्रजी व मराठी माध्यमाचे छत्रध्यापक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले
प्रस्तुत कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या नर्सिंग कॉलेजच्या मा. प्राचार्या जया मॅथ्यू मॅडम यांनी “covid-19 जनजागृती” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, कोरोना म्हणजे काय ? त्याची सुरुवात कुठून झाली? त्याची लक्षणे कोणती? या विषाणूपासून दूर राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? आहार कसा असावा?
याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा, डी.एड कॉलेजच्या मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डीएड कॉलेजचा विद्यार्थी, नवीन शैक्षणिक धोरणातील आव्हाने समर्थपणे पेलणाराच असेल, असे ठामपणे सांगितले .
महात्मा गांधी यांचे बुनियादी शिक्षण व नई तालीम या अंतर्गतचे उपक्रम मागील दोन वर्षापासून डीएड कॉलेज मध्ये राबवण्यात येत आहेत व याहीवर्षी हे उपक्रम राबवण्यात येतील असे त्यांनी सांगितले. तसेच अनुभव आधारित शिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण व नवीन शैक्षणिक धोरण याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्वच्छता ही स्वतःची नाही तर परिसराची सुद्धा केली पाहिजे हे सांगतानाच उपक्रम तेवढ्यापुरतेच करून सोडून देऊ नये तर कायम स्वरूपी उपक्रमातील गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची सुद्धा विद्यार्थ्यांना आठवण करून दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका सौ. नीता निंबाळकर यांनी केले. प्रास्ताविक अध्यापिका सौ निर्मला पाटील यांनी तर अध्यापिका सुनीता
माळाळे यांनी कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
. या कार्यक्रमासाठी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.