Prize Distribution Ceremony 2018-19
HomeCollege Events GalleryPrize Distribution Ceremony 2018-19

GALLERY

गरुडाकडून पंख घ्या
भरारी मारण्यासाठी ,
सूर्याकडून तेज घ्या
अंधाराच्या नाशासाठी,
पर्वताकडून निश्चय घ्या
निर्णयावर ठाम राहण्यासाठी,
वाऱ्याकडून वेग घ्या प्रगती पथावर अग्रेसर होण्यासाठी ।
जीवनात यशस्वी होण प्रत्येकाच्याच पदरात आहे अस नाही पण प्रयत्नवादी कधी अयशस्वी होत नाही…

हाच विचार मनात घेऊन, संस्थेचे चेअरमन मा.श्री धनराज विसपुते सरांच्या प्रेरणेने श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 2/2/2019 रोजी बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमासाठी मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थीं उपस्थित होते.
विजयी स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच परीक्षेत उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
मा.प्राचार्या कुसुम मधाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
श्रीमती वंदना चौधरी यांनी प्रस्तावना तर सौ. नीता निंबाळकर यांनी आभार प्रदर्शन केले.