पर्यावरण माझा गुरु
HomeCollege Events Galleryपर्यावरण माझा गुरु

GALLERY

पर्यावरण माझा गुरु” 🌳🌿 Interactive Webinar चे आयोजन… झाडे लावून संवर्धन करणे हीच आपुली जबाबदारी, झाडे जगली तरच जगेल पृथ्वीवरची सृष्टी सारी… आदर्श शैक्षणिक समूह, न्यू पनवेलआणि परिसर आशा यांच्या संयुक्त विद्यमाने ” वनसंवर्धन सप्ताह आणि गुरुपौर्णिमा ” यांचे औचित्य साधून जनजागृतीसाठी INTERACTIVE WEBINAR …. “पर्यावरण माझा गुरु” – चे आयोजन दिनांक 5 जूलै रोजी करण्यात आले. सकाळी 11 वाजता वेबिनारचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.या वेबिनार साठी आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, व्हाइस चेअरमन मा. नानासाहेब विसपुते, संस्थेच्या सेक्रेटरी मा. सौ संगीता विसपुते, प्रमुख अतिथी डॉक्टर मिहिर पारेख, वेबिनार च्या प्रमुख वक्त्या, परिसर आशाच्या सी ईओ सन्माननीय आरती सौर, सर्व विभागाचे प्राचार्य, नाशिक, धुळे, रत्नागिरी, पुणे, बुलढाणा, औरंगाबाद इ. जिल्ह्याचे विभाग प्रमुख, सर्व विभागाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन मा.श्री विसपुते सरांनी आपल्या बहुमोल मार्गदर्शनात कोरोनाला संकट न समजता एक संधी म्हणून पाहण्याची दृष्टी दिली. या काळात तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत प्रभावीपणे केला गेला. संस्थेने जवळजवळ 65 वेबिनार चे आयोजन केले. त्यामुळे कोरोना हा आपला गुरु ठरला असे त्यांनी सांगितले. संस्थेचे व्हाइस चेअरमन मा. श्री नानासाहेब विसपुते यांनी मार्गदर्शन करताना पर्यावरण व गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगत पर्यावरणाची काळजी घेणे आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे हे नमूद केले. डॉ. मिहिर पारेख यांनी गुरुपौर्णिमा व पर्यावरण यांची सांगड घालत गुरु शब्दाची फोड करून गुरु म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा तो गुरू या शब्दात आपल्या भावना मांडल्या. तसेच येत्या काळात ऑनलाईन कोर्स चे महत्व सांगितले. वेबिनार चा प्रमुख वक्त्या आरती सौर यांनी पर्यावरण ही संकल्पना किती व्यापक आहे हे आपल्या ओघवत्या शैलीतून सर्वांना जाणीव करून दिली. त्यांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेऊन तसेच युट्युब व्हिडीओ, पीपीटी च्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधला. वेबिनार चे प्रास्ताविक व आभार विसपुते डीएड कॉलेजच्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे यांनी केले तर आपल्या सूत्रसंचालनातून मा. प्राचार्या श्रीमती जगताप यांनी सर्वांना खिळवून ठेवले. प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमानंतर वेबिनार ची सांगता वंदेमातरम् ने झाली.