आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री .डी .डी .विसपुते अध्यापक विद्यालयामध्ये एस रंगनाथन यांच्या जयंती निमित्त 12 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमात प्रथम डी एड कॉलेज च्या प्राचार्या कुसुम मधाळे यांनी एस रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन केले .त्या नंतर प्रास्ताविकात कार्यक्रम हेतू स्पष्ट करण्यात आला .अध्यापक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्रविण आवारे यांनी ना .धो .महानोर यांच्या कवितेचे वाचन केले .अंजना राठोड ,वांशिका सुर्वे व रितु पवार या विद्यार्थिनिनी कविता सादर केल्या .कार्यालयीन कर्मचारी मोहिनी गायकवाड हिने राम गणेश गडकरी यांचा साहित्य परिचय वाचून दाखविला .ग्रंथपाल श्री भीमानंद पगारे यांनी स्व रचित कविता सादर केली .व कार्यक्रमाच्या शेवटी पगारे सरांनी आभार व्यक्त केले .या कार्यक्रमाचं सूत्र संचालन वरिष्ठ लिपिक मनिषा तोडेकर यांनी केले .विद्यार्थ्यांच्या बहुसंख्य उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला .
National Library Day
GALLERY