Nai Taleem prize distribution
HomeCollege Events GalleryNai Taleem prize distribution

GALLERY

” नई तालीम “…
पी.पी.टी. सादरीकरण स्पर्धा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद-नई तालीम- प्रायोगिक शिक्षा.गांधीजींच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक पैलूंना प्रोत्साहन देण्यासाठी दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी डी.आय.इ.सी.पी.डी.यांच्या विद्यमाने, श्री. डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालयात पी.पी.टी.सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली.
महात्मा गांधीजीचा नई तालीम हा एक अभिनव उपक्रम आहे. त्यांचा शिक्षण विचार 3H म्हणजे मन, मेंदू आणि हात यांना जोडणारा होता. त्यांच्या मते, हाताने श्रमदान करावे, मनाने समाजातील दुर्बलाचा विचार करावा आणि बुद्धीच्या विवेकाने संबंध राष्ट्रजीवन उजळून टाकावे. असे स्वावलंबी शिक्षण, ओजस्वी शिक्षण गांधीजीना अभिप्रेत होते. या शिक्षण विचारामध्ये स्वावलंबन, आत्मसन्मान आणि श्रमप्रतिष्ठा ही तीन मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आहे.
नई तालीम स्पर्धेसाठी छात्रअध्यापकांनी 1.आरोग्य, 2.आरोग्य विज्ञान, 3.पोषण, स्वच्छता 4.जीवन कौशल्य आणि चारित्र निर्माण, 5.कार्यशिक्षण आणि समाज या विषयावर सादरीकरण केले.
या स्पर्धेसाठी डी.आय. इ.सी.पी.डी. च्या अधिव्याख्याता श्रीमती सुनिता राठोड , अधिव्याख्याता श्री. रामदास टोणे, विषय सहाय्यक प्रवीण देवरे, विषय सहाय्यक श्रीमती सोनल गांवड, श्री दिनेश पाडवी, शासकीय अध्यापक विद्यालय, सासवणे, विसपुते अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे , अध्यापक व छात्रअध्यापक उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून श्रीमती सुनिता राठोड, श्री. दिनेश पाडवी व श्रीमती श्वेता उपानेकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल :
प्रथम क्रमांक- डी.आय. इ.सी.पी.डी.पनवेल
व्दितीय क्रमांक- श्री. डी. डी.विसपुते अध्यापक विद्यालय,पनवेल
तिसरा क्रमांक – शासकीय अध्यापक विद्यालय, सासवणे
यांना मिळाला.
विसपुते अध्यापक विद्यालयाच्या मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे व डी.आय. इ.सी.पी.डी. च्या अधिव्याख्याता मा. श्रीमती सुनिता राठोड यांनी छात्रअध्यापकांना मार्गदर्शन व विजेत्यांचे अभिनंदन केले.