GALLERY
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ,श्री डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 4 नोव्हेबर 2023 या दिवशी दुपारी ठिक 2.30 वाजता महाराष्ट् लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या सहकार्याने श्री.डी.डी विसपुते अध्यापक विद्यालय नवीन पनवेल व अमरदिप बालविकास फाऊ़़ंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
गणितीय जादू व गणितातील गमती जमंती या कार्यक्रमाचेआयोजन करण्यात .या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते, श्री प्रधान कुलकर्णी साहेब,श्री दळवी सर,श्री ताकमोघे मॅडम, श्री ताकमोघे सर व इतर मान्यवर
या सर्वांचे प्रथम काॅलेजच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले.मा.मधाळे मॅडम यांनी प्रधान साहेबाचा परिचय देवून ,शाल व स्मृतिचिन्ह देवून सत्कार केला.
गणितातील जादू व त्यातील गमंती जमंती कशा असतात याची सुरूवात मा.प्रधान साहेबांनी अतियश मनोरंजक पध्दतीने केली.मित्र सखा जिवलग असावा
तो जिवलग आहे की नाही हे गणितीय पध्दतीने पटवून सांगितले.
आईचं महत्व किती असते,आई म्हणजे सर्वस्व तिला नमस्कार करा त्या नमस्कारमुळे तुमचं कल्याण होणार ,आपण मोठे होणार आहात .सर्व कामात झोकून द्या, कोणतेही काम प्रामाणिकपणे करा.त्यात जीव ओता.आवडीच्या कामात यश मिळवा. असा मौलिक स्वरूपाचा सल्ला मुलांना दिला.वेगवेगळय़ा गणितीय युक्त्या मुलांना सांगितल्या.आपण जास्त प्रेम कोणावर करतो,आपला लकी नंबर कसा काढायचा ,हाताच्या बोटाच्या मदतीने sinची किंमत कशी काढायची हे ही सांगितले.प्रत्यक्षात छात्राध्यापकांच्या मदतीने गणितीय पध्दतीने कृती करून घेतल्या. गणिताच्या इतिहासाचा उलघडा छात्राध्यापकांच्या समोर केला.छात्राध्यापकांच्याकडून गुरूदक्षिणा मागितली.ती गुरूदक्षिणा अशी होती
*आयुष्यात कोणतेच व्यसन मी लावून घेणार नाही.
*आईला नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडणार नाही.
*आपल्या आवडत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवणारचं
*भारत देशा विषयी सदैव अभिमान बाळगणार .
ही चार वचना संबंधी सदैव कटिबध्द रहायचे आश्वासन मुलांच्या कडून घेतले. मा.दळवी सरांनी वर्ग व वर्गमूळ कसे काढावे तसेच धनमूळ काढताना कशा युक्त्या वापराव्यात ह्याचे उत्तमपणे ज्ञान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना म्हात्रे मॅडम यांनी केले
या कार्यक्रमासाठी अध्यापक विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.