मराठी राजभाषा दिन
HomeCollege Events Galleryमराठी राजभाषा दिन

GALLERY

मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न”

काना, मात्रा, वेलांटीने नटलेली,
माझी भाषा, माझी बोली, माय मराठी।
जीवन जिथून सुरू होई,.
त्याच अक्षराने प्रारंभ होई,
अशी माय मराठी,
तिचे अद्याक्षरही ‘अ, आ, ई’ !

दिनांक 27,/2/2022 रोजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री. विसपुते सर यांच्या प्रेरणेने व डी.एड. कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “मराठी राजभाषा दिन” वि.वा. शिरवाडकर , कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
प्रथम व्हर्चुअल पद्धतीने दीपप्रज्वलन व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षांचा परिचय व स्वागत अंकिता गमरे या विद्यार्थ्यीनीने केले.
या कार्यक्रमामध्ये , सामुहिक नृत्य सादरीकरण, भाषिक खेळ, शब्द कोडी इत्यादी मनोरंजनपर उपक्रम घेण्यात आले. वैष्णवी ठोकळ हिने मराठी भाषेचा पोवाडा उत्तमरीत्या सादर केला. गौरी कडू या विद्यार्थिनींनी जात्यावरच्या ओव्या सादर केल्या. मराठीची थोरवी सांगणा-या कविता काही विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
मेघा म्हात्रे यांनी मराठी भाषा का जोपासली गेली पाहिजे? याविषयी आपले मत व्यक्त केले. अध्यापिका सौ. नीता निंबाळकर यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचा वापर दैनंदिन जीवनात तसेच व्यवहारात केला पाहिजे तसेच स्वतः पासून सुरूवात केली गेली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगत, भाषेवर प्रभुत्व असेल तर प्रभावी संभाषण करता येते. आपले विचार प्रभावीपणे व्यक्त केले जाऊ शकतात असे सांगितले. तसेच उत्तम कार्यक्रम सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका वैशाली भांड हिने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती म्हात्रे या विद्यार्थीनीने केले. लीना पाटील या छात्राध्यापीकेने पीपीटी तयार करून सादरीकरण केले. शेवटी कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.