Maharashtra Police Raising Week
GALLERY
‘पोलिस आयुक्तालय, बेलापूर’ क्षेत्रभेट
क्षेत्रभेटीच्या माध्यमातून पोलिस व पोलीस खात्याविषयी जनमाणसात जनजागृती घडवावी आणि भविष्यात चांगले नागरिक घडावेत या हेतूने, पोलिस आयुक्तालय, बेलापूर यांनी महाराष्ट्र पोलिस वर्धापन सप्ताहाचे तसेच ‘रेजिंग डे’ चे आयोजन केले.
दिनांक 07/01/2020, आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाने श्री. डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालयाने क्षेत्रभेट आयोजित केली.
या क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी १. श्वानपथक २. बॉम शोधक व नाशक पथक ३. शस्त्रागार-जलद प्रतिसाद पथक ४. रचना आयुक्तालय कक्ष
५. पोलिस कोठडी/संगणक कक्ष ६. पोलिस ठाणे अंमलदार कक्ष ७. महिला सहाय्यक कक्ष
८. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष ९.सायबर गुन्हे कक्ष १०.अंगुली मुद्रा विभाग ११.अंमली पदार्थ निर्बंध कक्ष १२.वाहतूक विभाग.
अशा एकूण १२ विभागाला भेट दिली.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयामध्ये महाराष्ट्र पोलिस वर्धापन सप्ताह २०२०च्या निमित्ताने 2 ते 8 जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सी.बी.डी. बेलापूर् पोलिस आयुक्त कार्यालयासमोरील मैदानावर पोलिस दलातील विविध शाखा आणि कामकाजाची माहिती समाजातील विविध घटक, नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून प्रदर्शन भरविण्यात आले.
या प्रदर्शनाला श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भेट देऊन पोलिसांच्या कामाविषयी माहिती घेतली.