Krantijyoti Savitrimai Phule Jayanti 2020

GALLERY

✍ बालिका दिन✍ विद्येची जननी, आद्यशिक्षिका, आद्यमुख्याधापिका, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची आज १८९ जयंती… दि.०३/१/२०२० आज “बालिका दिन” याचेच औचित्य साधून, आदर्श शिक्षण समुहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते सरांच्या प्रेरणेने, डी.एड.विभागाच्या मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीमाईंची जयंती साजरी करण्यात आली. प्रस्तुत कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. कुसुम मधाळे मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डी.एड. च्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती देत, त्यांच्या त्यागाची सर्वांना आठवण करून दिली . प्राचार्या कुसुम मधाळे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची शिकवण आचरणात आणणे आजच्या घडीला किती महत्त्वाचे आहे, हे विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमासाठी डी.एड्. शिक्षक, कर्मचारी व छात्राध्यापक उपस्थित होते.