GALLERY
‘स्त्री’
शब्द एक, अर्थ अनेक म्हणजे स्त्री।
अनेक छटा, अनेक रूपं ,अनेक भूमिका आणि अनेक रंग आहे स्त्री।
म्हटलं तर व्यक्ती,म्हटलं तर शक्ती आहे स्त्री.
म्हटलं तर वर्तमान आणि जगाच भविष्य आहे स्त्री।
कधी अश्रूंची ,कधी पात्याची धार,
कधी नजरेचा वार आहे स्त्री।
कपाळावरच कूंकू आणि कूंकू एवढं आभाळ आहे स्त्री।
आणि सगळ्यात शेवटी कालची ती आणि आजची गती आहे स्त्री।
दिनांक 8/3/2019 रोजी जागतिक महिला दिन संस्थेचे चेअरमन मा.श्री धनराज विसपुते सरांच्या प्रेरणेने श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयात साजरा करण्यात आला. या
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ लेखिका व विचारवंत आदरणीय श्रीमती चंदाराणी कोंडाळकर, मा.श्री धनराजजी विसपुते , मा. संचालिका सौ.संगीता विसपुते मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे, सर्व विभागाचे प्राचार्य , महिला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थीं उपस्थित होते.
यशस्वी महिलांना तुळशीचे रोप देऊन गौरविण्यात आले.
मा.प्राचार्या कुसुम मधाळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. मा. संचालिका सौ.संगीता विसपुते यांनी सर्वांचे अभिनंदन करत मार्गदर्शन केले. बी.एड. विभागाच्या प्राचार्या मा. सीमा कांबळे यांनी आदरणीय श्रीमती चंदाराणी कोंडाळकर यांची मुलाखत घेतली.
डी.एल.एड. च्या विद्यार्थ्यींनीनी ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमाव्दारे कर्तृत्ववान महिलांना मानवंदना दिली.