Independence Day 2019
HomeCollege Events GalleryIndependence Day 2019

GALLERY

उत्सव तीन रंगाचा
आभाळीआज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला।।

आज 15 ऑगस्ट 2019 भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन ..

आदर्श शैक्षणिक समूहात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व संचालिका मा.सौ.संगिता विसपुते यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने 15 ऑगस्ट ध्वजारोहण कार्यक्रम आनंदोत्सवात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, पनवेलचे प्रख्यात व नावाजलेले मा.डॉ.श्री.गिरीशजी गुणे यांनी राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकविला.

यानंतर डॉ.गिरीशजी गुणे यांनी उपस्थित सर्वाना संबोधित करताना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, विद्यार्थी हे देशाचे खंबीर नागरिक होण्यासाठी शिक्षकांनी त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थाचा देखील विचार करावा असे सांगत उत्तम आरोग्याचा मूलमंत्र दिला.
प्रायमरी विभागाच्या प्राचार्या मा.डॉ. आरिफा शेख व नर्सिंग विभागाच्या प्राचार्या मा.जया मॅडम यांनी स्वतंत्रता दिवसावर आपले विचार मांडले.
डी. एड. विभागाच्या प्राचार्या मा. कुसुम मधाळे यांच्या उत्तम नियोजन व मार्गदर्शनाने विचुंबे देवद येथील ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.नीता निबांळकर यांनी केले.