Helmet Rally 2020
HomeCollege Events GalleryHelmet Rally 2020

GALLERY

‘ हेल्मेट रॅली..२०२० ‘ ” आपने हाथो करनी है, अपनी ही रक्षा, हेल्मेट एक बोझ नहीं, है खुदकी सुरक्षा…..” आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ श्री.बापूसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज आणि प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक शाखा, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२० अंतर्गत ‘ हेल्मेट रॅलीचे ‘ आयोजन करण्यात आले. सामाजिक जाणिव जागृती हे ध्येय समोर ठेवून आदर्श शैक्षणिक समूह नेहमीच विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करत असते याचाच एक भाग म्हणून आज दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी रस्ता सुरक्षेसंदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी भव्य हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत रॅलीसाठी पोलीस उपायुक्त मा.श्री.सुनील लोखंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी मा.श्रीमती हेमांगिनी पाटील, जागतिक कल्याण राजदूत भारत मा. डाॅ. रेखा चौधरी, आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते सर, डी.एड्.विभागाच्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे, सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. मा.श्रीमती हेमांगिनी पाटील यांनी पनवेल हा महाराष्ट्रातील कमी अपघात असणारा तालुका असल्याचे सांगितले. मा.श्री.सुनील लोखंडे यांनी भारतात दर चार मिनिटाला एक अपघात होतो असे सांगितले. मा. डाॅ. रेखा चौधरी यांनी “digital detox” ही चळवळ प्रभावी करण्याचे आवाहन केले.मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक स्वास्थ्य तर बिघडतेच पण अपघात ही होतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते सरांनी आपल्या मनोगतातून सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे ही सर्वांचीच जबाबदारी व कर्तव्य आहे, ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. असे म्हणत आदर्श समूह नेहमीच ही जबाबदारी पार पाडेल अशी ग्वाही दिली. रॅलीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पोलिस अधिकारी सहभागी झाले. या सर्वांच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृती करून नवा संदेश समाजाला देण्यात आला.