Guidance of D.El.Ed. Exam 2018-19
HomeCollege Events GalleryGuidance of D.El.Ed. Exam 2018-19

GALLERY

डी.एल.एड ‘परीक्षा मार्गदर्शन 2018-19 ‘

मला हवा हो गुरु, ध्येय गाठायला.
कठीण रस्त्यावर मार्गदर्शन करायला..
कधी चुकले पाऊल तर सावरायला
कधी हरवल्या दिशा तर दाखवायला …

हाच विचार मनात घेऊन, श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 30/3/2019 रोजी संस्थेचे चेअरमन मा.श्री धनराज विसपुते सरांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली “डी.एल. एड. परीक्षा मार्गदर्शनाचे ” आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी , शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थीं उपस्थित होते.
मा.राजेश वर्तक सर व मा.मंगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. पेपर लिहीताना काय काय अडचणी येतात हे सांगत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देत शंकांचे निरसन केले व
यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
श्रीमती वंदना चौधरी यांनी प्रस्तावना, स्वागत तर सौ. निर्मला पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.