Free Health Check Up & Blood Donation Camp
HomeCollege Events GalleryFree Health Check Up & Blood Donation Camp

GALLERY

💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

“आई नाही म्हणूनी माझे
प्रारब्धच अवघे मळले ,
मी फिरता माझ्या मधूनी
अस्तित्व तिचे आढळले”

दिनांक ३१/१२/२०१९ आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री.धनराजजी विसपुते यांच्या मातोश्री कमलबाई विसपुते यांचा ७ वा स्मृतीदिन.
सामाजिक परिस्थितीचे भान असलेल्या मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी,
महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्त्या, मा.अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले.
प्रस्तुत कार्यक्रमात अपर्णाताईंनी “चला नाती जपुया” या विषयावर सर्वाना मार्गदर्शन केले , बदलती कुटुंब व्यवस्था व तिचे नातेसंबंधावर होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.
या वेळी मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी आपल्या आईच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली , या नंतर सौ.वंदनाताई सोनार यांनीही आईला श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
डी.एड.विभागाच्या प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांनी आपल्या प्रस्ताविकातून विसपुते सरांच्या सामाजिक कार्याची माहिती देत मातोश्रीला श्रद्धांजली अर्पण केली.
बी.एड.विभागाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.