Diwali Celebration 2019
HomeCollege Events GalleryDiwali Celebration 2019

GALLERY

🎆🪔 दिवाळीचा सण। 🎆🪔
तमसो मा ज्योतिर्गमय‌‌।।
‌ राग, द्वेष जाळून।
🪔होवो कृतार्थ जीवन ।।🪔

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्री. डी. डी. विसपुते अध्यापक विद्यालय, पनवेल येथे आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाने दिपावली उत्साहाने साजरी करण्यात आली.
अध्या. श्रीमती वंदना चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाविषयी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेले दिवाळी भेट कार्ड व सजावट केलेल्या दिव्यांची मांडणी करण्यात आली..
अध्या. श्रीमती नीता निंबाळकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रदुषण मुक्त दिवाळीचा संदेश देत, दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व सांगितले.
करूणा मानकामे या विद्यार्थ्यांनीने सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन केले.
सर्वांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला.
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करत व दिवाळीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.