District-Level Inter-College Dance Competition

GALLERY

जिल्हास्तरीय आतंरविद्यालयीन नृत्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन दिनांक 16/01/2020 रोजीश्री. डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालय व        श्री. डी.डी.विसपुते विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आतंरविद्यालयीन नृत्य स्पर्धेचे (द्रमंत्र) आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी नवरस ही थीम ठेवण्यात आली . विविध जिल्ह्यांतील पंधरा ग्रुप स्पर्धेमध्ये सहभागी झाले. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम,  ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथम पारितोषिक -10,000व्दितीय पारितोषिक – 7000तृतीय पारितोषिक  -5000.    नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री अनिकेत गायकवाड, श्रीमती एकता बक्षी-केसकर, नितीन पाटील व सेजल पाटील यांनी काम पाहिले.  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणूनसन्माननीय रमेश धनावडे (सिनियर मॅनेजर एच आर कार्पोरेट अफेअर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड) सन्माननीय .श्री  डाॅ.अविनाश शेंद्रे( उपप्राचार्य प्रगती कला व वाणिज्य विद्यालय डोंबिवली,  सन्माननीय श्रीमती विजया चिंचोलकर (प्राचार्या, महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी वर्ग १ )  सन्माननीय मंगेश परुळेकर (प्रमोटर एम पी ग्रुप), इभ्रत सिनेमाचे कलाकार, संजय सेजवळ, शिल्पा ठाकरे, दिग्दर्शक प्रविण क्षीरसागर, पटकथा व संवाद लेखक संजय नवगिरे, आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री.धनराज विसपुते, डी.एड.काँलेजच्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे, सर्व विभागाचे प्राचार्य, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.  प्रमुख पाहुणे श्री. रमेश धनावडे  त्यांनी काव्याच्या माध्यमातून खूप सुंदर असे  मार्गदर्शन तर केलेच पण त्याबरोबर जीवनात प्लॅनिंग, प्रोसेस व टार्गेट याचे महत्त्व सांगितले.   अध्यक्षीय भाषणात विसपुते सरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देत, प्रेरणा दिली.  येत्या 15 फेब्रुवारीला  कॅम्पस मध्ये जाॅबफेअर ठेवून आदर्श ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणारीही आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.आभारप्रदर्शनानंतर वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.