GALLERY
आदर्श शिक्षण मंडळ संचालित श्री डी डी.विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 21 /10/2023 रोजी इंग्रजी विषयाचे संप्रेषण कौशल्य या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या होत्या मा. उज्ज्वला देशपांडे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रूजुता जगताप मॅडम यांनी केले.
अगदी सुरूवातीला शब्दसुमनाने प्रेक्षकवर्ग व अतिथीचे स्वागत झाले.त्यानंतर मा.मधाळे मॅडम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.आदरणीय अतिथी,मा.मधाळे मॅडम व प्राध्यापकांच्या हस्ते काव्यवाचन स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या छात्राध्यापकांना सर्टिफिकेट देवून गौरवण्यात आले.
इंग्रजी विषयाची छात्राध्यापकांच्या मनातील भिती कमी व्हावी व रोजच्या दैनदिन जीवनात इंग्रजी वाक्यांचा अस्खलितपणे वापर करावा.त्यांचा आत्मविश्वास वाढावा.हाच उद्देश ठेवून मा.मधाळे मॅडम यांनी या कार्य शाळेचे आयोजन केले होते.
अगदी सुरूवातीला मा.उज्ज्वला मॅडम यांनी प्रास्ताविक स्वरूपातील भाषणात स्वत:साठी अगदी सुरूवातीला टाळ्या वाजवल्या पाहिजेत.तसेच स्वत परिचय करून देताना आत्मविश्वास ठेवा. आपण प्राथमिक शिक्षक होणार याचा सार्थ अभिमान आपणास वाटला पाहिजे.प्राथमिक शिक्षक हा शिक्षण प्रक्रियेचा फार महत्वाचा आधारस्तंभ असतो.नेहमी हसत आपले कार्य करत रहा.इंग्रजी भाषा मूळात अवघड भाषा नाही,तिची मुळीच भिती वाटून घेवू नका असे सांगितले.मा.जगताप मॅडम यांनी कार्यशाळेचे स्वरूप सांगितले .त्यानंतर कार्यशाळची सुरूवात झाली.अगदी सुरूवातीला मा.देशपांडे मॅडम यांनी सर्वांना आपला परिचय व आपला आवडता खेळ कोणता तो सांगण्यास सांगितला.आपला आवडता नंबर सांगण्यास सांगितला व कार्डबोर्ड मदतीने प्रश्न विचारून छात्राध्यापकाना इंग्रजी मध्ये उत्तर सांगण्यासाठी शाब्दिक प्रोत्साहन दिले. छात्राध्यापकांचे ५ विद्यार्थी या प्रमाणे गट पाडण्यात आले.वेगवेगळ्याप्रकारे खेळ घेण्यात आले.
शेवटच्या सत्रात छात्राध्यापकांच्या शंकेचे निरसन मा.देशपांडे मॅडम यांनी केले. मा.मधाळे मॅडम यांच्या अध्यक्षेखाली व त्यांच्या नियोजन व मार्गदर्शनामुळे अतिशय उत्तमपणे हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी अध्यापक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.