छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022

GALLERY

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी…. राजे तूम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान । जगती तुम्ही छत्रपती, तुम्हीच आमचा स्वाभिमान ।। आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री. विसपुते सर यांच्या प्रेरणेने व डी.एड. कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. प्रथम व्हर्चुअल पद्धतीने दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये शिवगर्जना, देवांशू कदम यांनी तर मेघा म्हात्रे या विद्यार्थ्यीनीने, “एक नजर किल्ल्यांवर” याव्दारे शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास पी.पी.टी.व्दारे सादरीकरण केला. समरीन काझी या विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांच्या जीवनावर पाळणा सादर केला तर ज्योती म्हात्रे हिने उत्तमरीत्या पोवाडा सादर केला. तर ,काही छात्राध्यापकानी शिवजयंती निमित्त मनोगत व्यक्त केले. अध्यापिका सौ. नीता निंबाळकर यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती शत्रूही त्यांचा कसा आदर करत हे वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितले. तसेच शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक, मुत्सद्दी, शिस्तप्रिय, जाणता राजा होते याची माहिती दिली. सौ. सुनिता माळाळे यांनी उत्तम कार्यक्रम सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका मेघा म्हात्रे हिने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संज्योत साळुंखे या विद्यार्थीनीने केले. हर्षदा रणशूर हिने उत्तमरीत्या पीपीटी तयार करून सादरीकरण केले. देवांशू कदम या छात्राध्यापकाने कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.