GALLERY
श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 22 जुलै 2023 नवोगत छात्र्याध्यापक स्वागत सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा प्राचार्या कुसुम मधाळे मॅडम व सर्व अध्यापकांच्या हस्ते सरस्वतीपूजन, दिपप्रज्वलन करण्यात आले. अध्यापिका सौ. निर्मला पाटील यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून कार्यक्रमाची उद्दीष्टे स्पष्ट केली . वीडियोच्या माध्यमातून 2022/2023 चा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. डायट पनवेलच्या पदाधिका-यांची उपस्थिती कार्यक्रमास लाभली .श्रीयुत तुपे सरांनी विद्यार्थी वर्गास मार्गदर्शन केले. सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करा, संधी शोधा व त्या संधीचे सोने करा, दुसरे अतिथी श्रीयुत यादव सर यांनी मुलांना डी.एड नंतर नोकरीच्या वाटा व संधी. कोणत्या यावर प्रकाश टाकला. त्याच बरोबर मोलाचा असा संदेश दिला की नेहमी चांगल्या लोकाच्या संगतीत रहा,चांगल काम करा व चांगल काम करण्या -यांना पाठिंबा द्या.
व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कॉलेज विषयी कृतज्ञता व्यक्त करत स्वतःचे अनुभव सांगितले. प्रथम वर्षातील काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना जीवन जगत असताना नेहमी सकारात्मक रहा,तंत्रज्ञानाच्या जगात कौशल्यपूर्ण व विद्यार्थांच्या आवडीचा शिक्षक बना.कोणाची गुलामगिरी लाचारी स्विकारू नका असे सांगितले.
अध्यापक प्रविण आवारे सर,अध्यापिका सौ निर्मला पाटील, रुजुता जगताप,श्रीमती विनंती ,श्री डोगरदिवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व नवोगत छात्राध्यापकांचे स्वागत केले . या कार्यक्रमासाठी डायट पनवेलचे पदाधिकारी,अध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थीं वर्गाची उपस्थिती लाभली. वंदेमातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.