७३ वा प्रजासत्ताक दिन 2022

GALLERY

७३ वा प्रजासत्ताक दिन 🇮🇳 “उंच उंच फडकत राहो तिरंगा अपुला,. कधीही फिका न पडो रंग त्यातला, सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान, सदैव राहो या तिरंग्याची शान …” आदर्श शैक्षणिक समूहाच्या सेक्टर १५ येथील मुख्य संकुलामध्ये व विचुंबे येथील संकुलामध्ये आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. कुणाल मखिजा, पटेल हॉस्पिटल पनवेल, मा.श्री. श्रीरंग काणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुलाबा यांची उपस्थिती लाभली. या वेळी सर्व सामाजिक नियमांचे पालन करून प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर सामूहिकरित्या संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.डॉ. कुणाल मखिजा यांनी आरोग्यदायी जीवन जगण्याचा सल्ला उपस्थितांना दिला. मा. श्री. श्रीरंग काणे यांनी मार्गदर्शनपर भाषणात सुराज्य तयार करण्यासाठी प्रत्येकाला आपले कर्तव्य पार पाडावे लागेल असे सांगितले. आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी मार्गदर्शन करताना नवीन शैक्षणिक धोरण यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असे सांगितले. बी.एड विभागाच्या प्राचार्य डॉ. सीमा कांबळे यांनी 23 ते 26 जानेवारी हा सोहळा कसा साजरा करण्यात येतो हे सांगत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन यामधील फरक उपस्थितांना सांगितला तर सिनियर विभागाच्या प्राचार्या मा.श्रीम. विद्या मोहड यांनी या प्रसंगी आपल्या कर्तव्यावर प्रकाश टाकला तर बालवाडी विभागाच्या प्राचार्या मा.श्रीम. जाई जगताप यांनी घटनेचे महत्व विशद केले या कार्यक्रमासाठी आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन आणि भाजपा शैक्षणिक संस्था प्रकोष्टचे , प्रदेश सह संयोजक, दादासाहेब मा.श्री. धनराजजी विसपुते, सचिव, मा.श्रीम. संगिता विसपुते तसेच सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. “भारत माता की जय” या घोषणेने कार्यक्रमाची सांगता झाली.