72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या 2021
HomeCollege Events Gallery72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या 2021

GALLERY

“मिट्टी की खुशबू,
देशभक्ती कि फुहार
हातोमे तिरंगा,
भारत माता का प्यार”🇮🇳
💐72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐
आदर्श शैक्षणिक समूहात प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष मा. श्री नानासाहेब विसपुते व संचालिका मा.सौ.संगिता विसपुते यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने, मा. श्री आनंद बिंदूमाधव जोशी जिल्हा संपर्क प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सहाय्यक संचालक, वित्त विभाग यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सकाळी ७.४५ वाजता देवद-विचुंबे येथील शैक्षणिक संकुलामध्ये प्रमुख अतिथीं माननिय श्री आनंद बिंदूमाधव जोशी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण करण्यापूर्वी प्रथम संविधान उद्देशिकाचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले.
राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीतांमुळे वातावरणात वेगळाच उत्साह निर्माण झाला.
त्यानंतर बी. एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सीमा कांबळे यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती सांगितली . प्रमुख अतिथी माननिय श्री आनंद जोशी सर व माननिय नानासाहेब विसपुते सर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री धनराजजी विसपुते सर यांनी अध्यक्षीय भाषणात, भारत करोना महामारीचा धैर्याने व एकजुटीने मुकाबला करत संपूर्ण जगासाठी आदर्श ठरला आहे असे सांगितले.
या वेळी सर्व विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या या स्फूर्तिदायक दिनी “भारत माता की जय…” या घोषणांनी सारे आसमंत दुमदुमून गेले💐💐