15 August 2023 Celebration
HomeCollege Events Gallery15 August 2023 Celebration

GALLERY

ये वो धरती है जहाँ ऋषी मुनी जपते हैं सदैव प्रभु नाम की जपमाला।
ये वो देश है जहाॅ संत परंपराका होता है बोलबाला।
ये वो धरती है जहाॅ बहती है गंगाकी जलधारा।
ये वो देश है जिसे स्वतंत्र करनेके लिए जहाॅ अनेक युवा ओने अपने घरपर तुलसीपत्र रखकर “स्वतंत्रता” के लिए संसारका त्याग किया है।

🇮🇳

१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस. याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. शेकडो लोकांच्या रक्ताने लाल झालेल्या भारताच्या मातीने स्वातंत्र्याचा आजचा दिवस पाहिला. भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. आज आपण ७७ व्वा स्वातंत्र्यदिन मोठ्या अभिमानाने साजरा करत आहोत. याचेच औचीत्य साधून आदर्श शैक्षणिक समूहाच्या ,श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते स्कूल अँड कॉलेजेस मध्ये माजी सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता . सर्वप्रथम आदर्श समूहाच्या मुख्य संकुलामध्ये खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री .चंद्रकांत लांडगे साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
सदर कार्यक्रमानंतर आदर्श शैक्षणिक समूहाच्या देवद- विचुंबे येथील शैक्षणिक संकुलामध्ये मा.श्री.चंद्रकांत लांडगे साहेब , आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री. धनराजजी विसपूते सर, संचालिका मा.सौ. संगीता विसपुते मॅडम व माजी सैनिक यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी
१.श्री .रमेश दादा निकम
२.श्री.विजय तुकाराम लाड
३.श्री .अमर प्रसाद सिंग
४ श्री.फिरतुलाल कनोजिया
या माजी सैनिकांना सन्मानित करण्यात आले.व तद्नंतर देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री. चंद्रकांतजी लांडगे यांनी ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देवून आजच्या तरुणांनी देशाप्रती आपले कर्तव्य कसे पार पाडावे हे सांगत असताना सायबर क्राईमच्या माध्यमातून होणारे गुन्हे थांबवण्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले तर माजी सैनिक मा. श्री. अमर प्रताप सिंग यांनी अग्निवीर योजना आजच्या काळासाठी कशी उपयुक्त आहे हे सांगून या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने संधी मिळत आहे आणि आपण देशाप्रती कर्तव्य पार पाडत असताना या योजनेचा कसा लाभ घेतला पाहिजे याचे सखोल असे मार्गदर्शन करून उपस्थित सर्वांनाच एक नवी दिशा दाखवली. बी.एड कॉलेजच्या प्राचार्या मा.डॉ. सीमा कांबळे यांनी भारतीय इतिहासावर प्रकाश टाकत आपली आजची भूमिका आणि भारतीय इतिहास याची सांगड घातली तर आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये आदर्श समूहाचे चेअरमन मा. श्री. धनराजजी विसपुते यांनी स्वराज्य आणि सुराज्य यामधील सहसंबंध स्पष्ट करून देशाविषयी असलेले जाज्वल्य प्रेम व भक्ती आपल्याला कोणकोणत्या मार्गातून प्रत्यक्षात आणता येते हे सांगत सर्वांना ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन पुढील भूमिकांविषयी मार्गदर्शन केले .