GALLERY
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
श्री.डी. डी. विसपुते डी.एड.कॉलेजमध्ये
आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते सर , व डी. एड कॉलेजच्या प्राचार्या मा.श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 16 व 17 डिसेंबर 2022 रोजी वार्षिक क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
प्रथम श्री. डी. डी. विसपुते डी. एड.कॉलेज च्या प्राचार्या मा.श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व महान भारतीय हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत करून सर्व
छात्राध्यापकाकडून क्रिडाप्रतिज्ञा घेण्यात आली.
डी.डी.विसपुते डी. एड. कॉलेज च्या प्राचार्या मा.श्रीमती कुसुम मधाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यामध्ये कोणताही खेळ खेळल्याने त्याच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकास ही होतो. वैयक्तिक स्पर्धा व सांघिक स्पर्धा
मध्ये प्रत्येक स्पर्धकांनी कसे खेळले पाहिजे याचे मार्गदर्शन केले.
काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर
क्रीडा शिक्षक श्री.डोंगरदिवे सर यांनी खेळाचे महत्व सांगितले.
त्यानंतर विद्यार्थ्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेण्यात आले
श्री भीमानंद पगारे यांनी परीक्षक म्हणून काम केले तर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. नीता निंबाळकर व सौ.निर्मला पाटील मॅडम यांनी प्रत्येक खेळाची जबाबदारी घेऊन गुणलेखनाचे व समिती प्रमुख म्हणून काम केले.
या कार्यक्रमाला मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे मॅडम, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.