GALLERY
” या कार्यक्रमाचा भव्य दिव्य सोहळा संपन्न!!!*
“तुझ्या उत्तुंग भरारीपुढे
गगनही ठेंगने भासावे!!
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे!!”
अशा सर्वच स्त्री वर्गाला सलाम!सलाम!! सलाम!!!
आदर्श महिला मंडळ व सुवर्ण सखी महिला मंडळ , नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त दि- ११/०३/२०२३ रोजी संध्या. ४.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, संचालिका मा. सौ. संगिता विसपुते,मा. सौ.अर्चनाताई परेश ठाकूर,मा.सौ.किरण ताई दंडगव्हाळ, मा. सौ. वंदनाताई गुळवे, मा. सौ. आदितीताई सोनार,डॉ. जयश्री पाटील, मंगला चौधरी, वर्षा विभांडिक तसेच सर्व विभागांचे महिला प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होऊन, प्रास्ताविकातून सन्मान ती चा या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यात आली. सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक कार्यात उत्तुंग भरारी घेणाऱ्या विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये पोलिस, पोस्टवूमन, रिक्षा ड्राइव्हर, नर्स, खानावळ चालविणाऱ्या, सलून चालविणाऱ्या अशा विविध क्षेत्रातील भगिनींना सन्मानित करण्यात आले. यामध्ये..
जैन्नम्मा लालसन
श्रीम. संगीता सदानंद वेदपाठक
ज्योती विक्रम लोंढे
श्रीम. सिमरन प्रवीण कदम
श्रीम. संगीता नितीन जोशी
श्रीम. कल्पना कांबळे
श्रीम. अलका वसंत पाटील
प्रेम पदम सिंग
अर्चमा योगेश भोईर
सौ. कविता मारुती अगिवले
श्रीम. विद्या फडतरे
या सर्व कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली .
त्यानंतर सर्व मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून स्रियांनी अनेक क्षेत्रात पुढे येऊन देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान द्यावे असा मोलाचा संदेश दिला. मा. सौ. संगिता विसपुते यांनी आपल्या मार्गदर्शनातुन स्रियांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यात यावा असा संदेश त्यांनी दिला. मा. श्री. धनराजजी विसपुते यांनी अष्टशक्तीचे प्रतीक मानलेल्या स्त्री वर्गाला शुभेच्छा दिल्या.
शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.