छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2021
HomeCollege Events Galleryछत्रपती शिवाजी महाराज जयंती 2021

GALLERY

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी….
हिंदवी स्वराज्याचे जनक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचा राजा, जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा..🙏🙏
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री. विसपुते सर यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
प्रथम व्हर्चुअल पद्धतीने दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांचा परिचय व स्वागत, आयेशा खान या छात्राध्यापिकेने केला.
या कार्यक्रमामध्ये शिवगर्जना ,पाळणा, शिवरायांच्या जीवनावर आधारित व्हिडीओ दाखविण्यात आला. शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या गडकिल्ल्यांचे पी.पी.टी.व्दारे सादरीकरण करण्यात आले.
शिवकालीन लोककला ही गोष्ट लक्षात घेऊन काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
तर ,काही छात्राध्यापकानी शिवजयंती निमित्त मनोगत व्यक्त केले. यामध्ये कविता,पोवाडा,,गीत,छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण ,जीवनावर माहिती दिली. तर ‘छत्रपती शिवाजी महाराज ‘ या शब्दाचा अर्थ सुद्धा सांगितला गेला.
कॉलेजच्या अध्यापिका सौ निर्मला पाटील यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाशीच तुलना करता येत नाही हे सांगून त्यांनी शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते , पर्यावरणाचे रक्षण करणारे होते, स्वधर्म चिकित्सक राजे होते……… याची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या माननीय कुसुम मधाळे मॅडम यांनी झालेल्या कार्यक्रमा बद्दल मत व्यक्त करून मार्गदर्शन केले.
शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त वाचण्यासाठी ,बोलण्यासाठी नाही तर पुढे हा इतिहास तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा .हा संदेश दिला.
शेवटी विद्यार्थ्यांचे पुनश्च: अभिनंदन व कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका शुभांगी लोते हिने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदिनी शर्मा या विद्यार्थीनी ने केले. प्राजक्ता या छात्राध्यापिका ने कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.