अध्ययन अध्यापनातील ज्ञानरचनावाद 2022
GALLERY
“अध्ययन अध्यापनातील ज्ञानरचनावाद” एक दिवशीय कार्यशाळा संपन्न…
ज्ञानरचनावाद मूलाधार-
मुलांना प्रेरणा, आव्हान,
निवडीचे स्वातंत्र्य व
शिकण्याची संधी द्या,
मुले आपोआप शिकतात.
दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल व श्री डी. डी. विसपुते अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने
“अध्ययन अध्यापनातील ज्ञानरचनावाद” एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
मान्यवरांच्या स्वागताने कार्यशाळेची सुरूवात झाली.सकाळच्या सत्रात, प्रमुख मार्गदर्शक मा. श्रीमती सुनीता राठोड, अधिव्याख्याता डाएट, पनवेल यांनी “अध्ययन अध्यापनातील ज्ञानरचनावाद” या विषयावर पीपीटी व्दारे सादरीकरण केले.
दुपारच्या सत्रात, रा जि प शाळा विचुंबे येथील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श शिक्षिका श्रीमती सारिका पाटील यांनी इयत्ता सहावीचा इंग्रजी विषयाचा पाठ ज्ञानरचनावादानुसार घेतला. तसेच श्री. कमलाकर जकाकुरे यांनी इयत्ता सातवीचा विज्ञानाचा पाठ तर विजय रजपुत यांनी सातवीचा गणिताचा पाठ ज्ञानरचनावादानुसार घेतला. या कार्यशाळेसाठी राजिप शाळा, विचुंबे येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अध्यापक विद्यालयातील छात्राध्यापकांनी ज्ञानरचनावादी पाठाचे निरीक्षण करून चर्चेमध्ये सहभाग घेतला. तज्ञ मार्गदर्शकांनी छात्राध्यापकांच्या शंकांचे समाधान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांनी तर सूत्रसंचालन अध्यापिका सौ. नीता निंबाळकर यांनी केले.