समूहगीत स्पर्धा व वार्षिक क्रीडा स्पर्धा वितरण सोहळा
दिनांक 1एप्रिल 2023
आदर्श समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते सर यांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शना नुसार श्री.डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालया मध्ये समूहगीत स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
समूहगीत स्पर्धेसाठी ‘ देशभक्तीपर गाणे ‘ ही थीम ठेवण्यात आली होती. या स्पर्धेसाठी एकूण आठ ग्रुप केले होते.
सहशालेय उपक्रम व प्रात्यक्षिकाचे एक कार्य म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले गेले.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे मा. डॉ.अनंत जगन्नाथ वाघमारे यांची उपस्थिती लाभली. समूहगीत स्पर्धेचे परीक्षक म्हणून यांनी कार्य केले. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉक्टर अनंत वाघमारे यांच्या हस्ते वार्षिक क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण ही करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मा. डॉ.अनंत जगन्नाथ वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना समूहगीत कसे म्हंटले पाहिजे याचे मार्गदर्शन केले . तसेच विजयी ग्रुप चे नंबर ही सांगण्यात आले.
शेवटी प्राचार्या मा.कुसुम मधाळे मॅडम यांनी, सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करून विद्यार्थ्यांना आपला नंबर आला, नाही आला तरीही प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे हे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली.
समूहगीत स्पर्धा व वार्षिक क्रीडा स्पर्धा वितरण सोहळा
GALLERY