राष्ट्रीय गणित दिवस
HomeCollege Events Galleryराष्ट्रीय गणित दिवस

GALLERY

राष्ट्रीय गणित दिवस.’ उत्साहात साजरा.
यथा शिखा मयूराणां ,
नागानां मणयो यथा ।
तद् वेदांगशास्त्राणां ,
गणितं मूर्ध्नि वर्तते ॥
ज्याप्रमाणे मोराचा तुरा व नागा मध्ये मणीचे स्थान त्यांच्या सर्वोच्च स्थानी असते, त्याच प्रमाणे वेदात आणि शास्त्रांत गणित हे सर्वश्रेष्ठ व सर्वात उच्च स्थानी आहे.
श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 22/12/2020 रोजी आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री धनराजजी विसपुते सरांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाने ‘ राष्ट्रीय गणित दिवस.’ ऑनलाईन पद्धतीने गुगल मीटच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा परिचय व स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रस्तुत कार्यक्रमात प्रथम गणित विषयाची प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित व्हिडीओ दाखवण्यात आला. विद्यार्थीनींनी थोर भारतीय गणित तज्ज्ञांच्या जिवनावर व कार्यावर आधारित पी पी टी सादरीकरण तर केलेच, त्याचबरोबर ‘टाकाऊतून टिकाऊ’ या तत्वाचा अवलंब करून गणित शैक्षणिक साहित्याचे सादरीकरण पण करण्यात आले.
या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना अध्यापिका सौ. निर्मला पाटील यांनी राष्ट्रीय गणित दिवसाचे महत्व सांगत थोर भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.1729 या संख्येचे महत्व एका प्रसंगातून सांगितले. तर अध्यापिका सुनिता माळाळे यांनी रामानुजन चौकोनाची माहिती सांगत मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून डी.एड.विद्यार्थ्यांची Google forms वर Mathematics Quiz competition घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका रिझवाना शेख, अध्यक्षांचा परिचय व स्वागत ऋतुजा कोळी प्रास्ताविक सुवर्णा चितारे तर वर्षा कोळेकर हिने कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमासाठी , शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थीं उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.