प्रथम वर्ष (नवीन बॅच)स्वागत समारंभ व व्दितीय वर्ष सदिच्छा समारंभ 2021

GALLERY

श्री. डी. डी. विसपुते डी.एड कॉलेज मध्ये स्वागत समारंभ व सदिच्छा समारंभ संपन्न..

श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 04/10/2021 रोजी डी.एड. प्रथम वर्ष (नवीन बॅच)स्वागत समारंभ व व्दितीय वर्ष सदिच्छा समारंभ ऑनलाइन पद्धतीने उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस शब्दसुमनांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यांनतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यापिका सौ. निर्मला पाटील यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून कार्यक्रमाची रूपरेषा व उद्दीष्टे स्पष्ट केली. पीपीटीच्या माध्यमातून 2019-20 व 2020-21 मधील कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कॉलेज विषयी कृतज्ञता व्यक्त करत स्वतःचे अनुभव सांगितले.
प्रथम वर्षातील काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना विविध गोष्टींच्या आधारे comfort zone सोडून नवनवीन संधीचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा सल्ला दिला.
सर्व शिक्षकांनी प्रथम वर्ष (नवीन बॅच) विद्यार्थ्यांचे स्वागत करत व्दितीय वर्ष विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थीं उपस्थित होते.
सूत्रसंचालन ऋतूजा खताळ तर आभार निकिता वनारसे या विद्यार्थ्यींनीनी केले. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.