प्रथम वर्ष डी. एड. स्वागत समारंभ 2020

GALLERY

प्रथम वर्ष डी. एड. स्वागत समारंभ उत्साहात संपन्न…

श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 15/12/2020 रोजी संस्थेचे चेअरमन मा.श्री धनराजजी विसपुते सरांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. एड. प्रथम वर्ष स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी , शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थीं उपस्थित होते.
मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना डी.एड. चा विद्यार्थी किती परिवर्तन घडवू शकतो, आत्मसमाधानी शिक्षक व्हायचं असेल तर वेळेचे नियोजन, विचार प्रक्रिया व प्रेझेंटेबल पर्सनॅलिटी खूप महत्त्वाची आहे. तसेच काम करण्याची जिद्द, नवीन शिकण्याची उत्सुकता अंगी असणे किती महत्वाचे आहे, हे सांगितले.
व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कॉलेज विषयी कृतज्ञता व्यक्त करत स्वतःचे अनुभव सांगितले.
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. प्रथम वर्षातील काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सौ.माळाळे सुनिता यांनी प्रस्तावना केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता म्हात्रे तर आभार शुभांगी लोते या विद्यार्थ्यांनीनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.