जागतिक महिला दिन 2021

GALLERY

जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन..

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री. धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाने .’जागतिक महिला दिन’ कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
या कार्यक्रमाअंतर्गत कथाकथन, गीत गायन, वादन, अभिनय भित्तिपत्रक इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, अनुभव कथन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.