जागतिक भूगोल दिन 2022
HomeCollege Events Galleryजागतिक भूगोल दिन 2022

GALLERY

भूगोल महर्षी सी.डी. देशपांडे यांच्या स्मरणार्थ 1988 पासून दरवर्षी १४ जानेवारीला ‘भूगोल दिन’ साजरा केला जातो.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली “भूगोल दिन” हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
प्रथम ऑनलाईन पद्धतीने दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच मान्यवरांचा परिचय व स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
प्रस्तुत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भूगोल दिनाविषयी माहिती दिली. तसेच भूगोलावर आधारित कविता वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भूगोल विषयाचे शैक्षणिक साहित्य बनवून सादरीकरण केले. भूगोलाच्या सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मंजुषा घेण्यात आली. व्हिडिओच्या माध्यमातून भूगोल विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

अध्यापिका सौ.नीता निंबाळकर यांनी भूगोल दिनाचे महत्त्व सांगत प्रत्येक सण, उत्सव साजरे करताना त्यामागील उद्देश समजून घेणे आवश्यक आहे, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका सुनीता फुलारे यांनी केले
तर जयालक्ष्मी या विद्यार्थिनीने कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.