सर्व शाखेमध्ये भूगोल विषयाचा संबंध असणारा असा आंतरविद्द्याशाखीय असणारा ,ज्या विषयाचा आपण नेहमी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी उपयोग करतो असा हा भूगोल विषय……
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे
श्री.डी. डी. विसपुते कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री विसपुते सर यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागतिक भूगोल दिन’ हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
प्रथम ऑनलाईन पद्धतीने दीपप्रज्वलन करण्यात आले.तसेच मान्यवरांचा परिचय व स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
प्रस्तुत कार्यक्रमात प्रथम भूगोल विषयावर आधारीत अशी कविता घेऊन . तसेच भूगोल विषयाशी संबंधित काही व्हिडीओ दाखवून छात्राध्यापिका नी स्वतः तयार केलेल्या शैक्षणिक साहित्य द्वारा काही संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या.त्याबरोबरच व्हर्च्युअल पद्धतीने प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली .शेवटी काही विद्यार्थ्यांचे मनोगत सुद्धा झाले.
प्रस्तुत कार्यक्रमा मध्ये कॉलेजच्या अध्यापिका सौ. नीता निंबाळकर यांनी भूगोल विषय हा फक्त तारे, ग्रह , चंद्र ,सूर्य …..या पुरताच मर्यादित नाही तर भूगोल विषयाचा याही पलीकडे जाऊन अभ्यास केला जातो. त्यामुळे भूगोल विषयाला किती महत्त्व आहे हे सांगीतले.
शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व डी एड कॉलेज च्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांनी भूगोल विषयाबद्दल बहुमूल्य असे विद्यार्थ्या ना मार्गदर्शन करून ,कार्यक्रमांमध्ये नाविन्यता आणल्याबद्दल त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुकही केले.
आयेशा खान या विद्यार्थिनीने उत्कृष्टरित्या पीपीटी तयार केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका वर्षा कोळेकर यांनी केले तर अध्यक्षांचा परिचय तेजस्विनी गायकवाड या विद्यार्थिनीने केला.प्रास्ताविक शुभांगी लोते या छात्राध्यापिका ने केली तर. शेवटी रिजवान शेख हिने कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
. या कार्यक्रमासाठी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.