छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19.2.2023
HomeCollege Events Galleryछत्रपती शिवाजी महाराज जयंती 19.2.2023

GALLERY

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी….
हिंदवी स्वराज्याचे जनक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचा राजा, जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा..🙏🙏
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री. विसपुते सर यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
प्रथम दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रार्थनेने आणि शिवपाळणा व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांचा परिचय व स्वागत, प्रतीक्षा कांबळे या छात्राध्यापिकेने केला.

शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण ,जीवनावर माहिती देण्यात आली.
कॉलेजच्या अध्यापिका सौ निर्मला पाटील छत्रपती शिवाजी महाराजां विषयी आपले मनोगत व्यक्त
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या माननीय कुसुम मधाळे मॅडम यांनी झालेल्या कार्यक्रमा बद्दल मत व्यक्त करून मार्गदर्शन केले.
शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त वाचण्यासाठी ,बोलण्यासाठी नाही तर पुढे हा इतिहास तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा .हा संदेश दिला.
शेवटी विद्यार्थ्यांचे पुनश्च: अभिनंदन व कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका प्रतीक्षा कांबळे हिने केले . सविता सस्ते या छात्राध्यापिका ने कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.