गुरुपौर्णिमा, वनसंवर्धन दिन व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन
HomeCollege Events Galleryगुरुपौर्णिमा, वनसंवर्धन दिन व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन

GALLERY

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
श्री.डी. डी. विसपुते कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री विसपुते सर यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली
” गुरुपौर्णिमा, वनसंवर्धन दिन व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन ” हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
प्रथम ऑनलाईन पद्धतीने दीपप्रज्वलन करण्यात आले.तसेच मान्यवरांचा परिचय व स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
प्रस्तुत कार्यक्रमात प्रथम गुरुपौर्णिमा व वनसंवर्धन यावर आधारीत व्हिडीओ दाखविण्यात आला. तसेच काही विद्यार्थ्यांचे मनोगत झाले. यामध्ये छात्राध्यापकानी गुरूंना वंदन करून मनोगत व्यक्त केले.
प्रस्तुत कार्यक्रमा मध्ये कॉलेजच्या अध्यापिका सौ. नीता निंबाळकर यांनी वैदिक काळामधील गुरू-शिष्याचे नाते .तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या वृक्षाचे संरक्षण,संवर्धन करून भावी पिढीसाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे प्रत्येक सुज्ञ नागरिकांचे कर्तव्य असल्याची जाणिव करून दिली.
तसेच अध्यापिका सौ. निर्मला पाटील यांनी गुरु शिष्य वर आधारित गोष्ट सांगितली.
शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व डी एड कॉलेज च्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांनी गुरूंकडून मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारासाठी करावा.हा संदेश छात्राध्यापकाना दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका बलजीत सिंग यांनी केले तर अध्यक्षांचा परिचय नंदिनी शर्मा या विद्यार्थिनीने केला.प्रास्ताविक शुभांगी लोते या छात्राध्यापिका ने केली . शेवटी राणू या विद्यार्थिनीने कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
. या कार्यक्रमासाठी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.