Ullas – New India Literacy Program Year 2025-26
GALLERY
शनिवार दिनांक 26 जुलै 2025
श्री.डी.डी. विसपुते डी एड कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘ उल्लास ‘ नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2025 – 26 चे आयोजन……
शनिवार दिनांक 26 जुलै 2025
श्री.डी.डी. विसपुते डी. एड. कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘ उल्लास ‘ नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2025 – 26 चे या कार्यक्रमाचे
आयोजन कॉलेज च्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अध्यापिका सौ .नीता निंबाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
प्रथम, मा. श्री समीर सय्यद सर – उपशिक्षक शाळा वडघर उर्दू ,ता.पनवेल तथा जिल्हा समन्वयक.यांनी विद्यार्थ्यांना ‘ उल्हास ‘ नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2025 – 26 या विषयावर थोडक्यात माहिती सांगितली. यामध्ये त्यांनी जे कोणी निरक्षर व्यक्ती आहेत त्यांना साक्षर करणे म्हणजेच निरक्षरांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना साक्षर करणे हे challenge विद्यार्थ्यांनी स्वीकारले पाहिजे. याशिवाय पी.पी.टी द्वारे ‘ उल्लास ‘ ॲप तुम्ही कसे वापरावयाचे हे प्रत्यक्ष कृती मधून सांगितले.
तर, मा.श्रीमती प्रियंका पाटील मॅडम – गटशिक्षणाधिकारी उरण , प्रकल्प समन्वयक .यांनी निरक्षरांना साक्षर करण्यासाठी साहित्य ऑनलाईन पुरविले जाईल. चांगले काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली आहे. असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी डी.एड कॉलेजचे विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















