Vispute Mam Birthday Celebration

Home 9 College Events Gallery 9 Vispute Mam Birthday Celebration

GALLERY

अभिष्टचिंतन सोहळा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा..
आदर्श शैक्षणिक समूहाच्या सचिव सौ संगीता विसपुते यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या च्या औचित्याने
आदर्श शैक्षणिक समूह संचलित, डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालय, आदर्श टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पनवेल. आणि दि म्हसळा टाइम्स, रुक्मिणी पांडुरंग चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,
राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आणि प्रकाशन सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला.
नाशिक ढोल आणि लेझीमच्या तालावर सर्व प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले, महाराष्ट्र गीताच्या दिमाखदार गायनानी सभागृहाचा संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला. प्रसन्न मंगलमय वातावरणात दीपप्रज्वलन सरस्वती पूजन करून, गणेश वंदना,देवी स्तुती अशा विविध नृत्याविष्कार सादर करीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अतिथी देवो भव या उक्ती ला साजेसा प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
ग्रंथ दिंडीच्या गजरातून वाजत गाजत एका अनोख्या पद्धतीने, कै. डी. ए. जगताप लिखित कायापालट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न झाला.
राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यातील विविध प्रकारच्या पुरस्कारांनी राज्यभरातील ४६ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
श्री. एन. के. गीते यांच्या उत्कृष्ठ सूत्रसंचालनातून कार्यक्रमाने एक वेगळी उंची गाठली.
या कार्यक्रमाप्रसंगी पुढील मान्यवरांची उपस्थिती लाभली,
उदघाटक
मा.श्री.धनराजजी विसपुते
(चेअरमन आदर्श शैक्षणिक समूह, प्रदेश संयोजक पदवीधर प्रकोष्ठ भाजपा महाराष्ट्र)
कार्यक्रमाचे अध्यक्ष:
डॉ.श्री.रोहिदास नारायण दुसार (निवृत्त सहायक पोलीस आयुक्त, मुंबई तथा उप संपादक दिवाळी अंक, दि म्हसळा टाइम्स)
प्रमुख पाहुणे:
मा.सौ.संगिता विसपुते
(सचिव, आदर्श शैक्षणिक समूह )
मा.श्री.व्यंकटेश कल्याणकर
(प्रकल्प संशोधक, यशदा पुणे
सल्लागार वल्लरी प्रकाशन पुणे)
मा.सौ.पाकिजा आत्तार
(निवृत्त शिक्षिका, समुपदेशक, लेखिका)
मा.सौ.शुभदा रमेश पोटले,
(संपादिका,प्रकाशक दै.दि म्हसळा टाइम्स)
यांची उपस्थिती लाभली.
श्रीम.कुसुम मधाळे,
(प्राचार्या, डी. डी. विसपुते अध्यापक विद्यालय)
श्रीम.जाई जगताप.
(प्राचार्या, आदर्श टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिटयूट)
श्री सुनील चिटणीस,
(पुरस्कार नियोजन समिती अध्यक्ष,)
श्री रमेश पोटले, (संस्थापक,व्यवस्थापकीय संपादक)
या सर्वांच्या अविरत मेहनतीने सदर सोहळा दिमाखात संपन्न झाला.