Organizing Secondary and Higher Secondary Level KALA UTSAV 2025 – 26

Home 9 College Events Gallery 9 Organizing Secondary and Higher Secondary Level KALA UTSAV 2025 – 26

GALLERY

दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी NCERT दिल्ली यांच्यासूचनेनुसार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जिल्हारायगड आयोजित श्री.डी.डी विसपुते अध्यापक विद्यालय, नवीन पनवेल, जिल्हा रायगड येथे माध्यमिक व उच्चमाध्यमिक स्तरावरील कला उत्सव 2025 – 26 चे आयोजनकरण्यात आले होते.
सदर कार्यक्रमासाठी जिल्हा शिक्षणप्रशिक्षण संस्था पनवेल रायगड चे उपप्राचार्य डॉ.श्री.इरफानइनामदार सर, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. कामशेट्टी सर,अधिव्याख्याता श्रीम. सुवर्णा तोरणे मॅडम, आदर्श शैक्षणिकसमूह च्या सचिव सौ. संगीता विसपुते मॅडम, साधन व्यक्ती,स्पर्धा परीक्षक, विविध शाळांचे शिक्षक, स्पर्धक तसेचअध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीम. कुसुम मधाळे मॅडम,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सुरुवातीस स्पर्धकांना प्रवेश पत्रिका देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करून, स्पर्धांचेआयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम. तोरणे मॅडम, मार्गदर्शन डॉ. इनामदार सर, यांनी केले.
तसेचउपस्थित स्पर्धकांना सौ. विसपुते मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अध्यापक विद्यालयाच्याप्राचार्या कुसुम मधाळे मॅडम यांनी तर कार्यक्रमाचेसूत्रसंचालन डॉ. मंदाकिनी बाविस्कर मॅडम यांनी केले.
या कलाउत्सवात एकूण 13 स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेहोते.
स्पर्धा झाल्यानंतर लगेचच परीक्षकांकडून मूल्यमापनकरून, विजेत्यांचे व परीक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
जिल्हास्तरी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरावरयश मिळवण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व कार्यक्रमाचीसांगता करण्यात आली.