ग्रंथपाल दिन 2021
HomeCollege Events Galleryग्रंथपाल दिन 2021

GALLERY

ग्रंथालय शास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘ डॉक्टर एस. आर. रंगनाथन ‘ यांची जयंती.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.डी. डी. विसपुते डी.एड.कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते सर ,संचालिका मा.सौ.संगिता विसपुते मॅडम यांच्या प्रेरणेने, व डी. एड
कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली
‘ग्रंथपाल दिन’ हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला.
प्रथम व्हर्च्युअल पद्धतीने दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच मान्यवरांचा परिचय व स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
प्रस्तुत कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने डी.डी.विसपुते डी.एड. कॉलेजच्या ग्रंथालयाची भेट व्हिडिओ क्लिप द्वारे करण्यात आली.
काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुस्तकांचे महत्व व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्याबद्दल माहिती सांगितली.
ग्रंथपाल श्री.पगारे सर यांनी ग्रंथालय बाबत आपल्या भावना व्यक्त करून डॉ. एस. आर.रंगनाथन यांचा जीवन परिचय सांगितला.
शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व डी. एड. कॉलेज च्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांनी, झालेल्या कार्यक्रमाबद्दल आपले मत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी आपण वाचन नेहमी करावे परंतु फक्त नुसते वाचन करून चालत नाही तर, जे वाचलेले असते ते स्टोरेज करणे हे ‘ब्रेन स्किल’ सुद्धा आपल्याकडे असले पाहिजे. तसेच, पुस्तकाचे आपल्या जीवनातील महत्त्व, वाचन केल्याने होणारे फायदे, वाचनाने आपल्या वर्तनात व दृष्टिकोनात बदल कसा होतो हे सांगितले.
शेवटी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून काही पुस्तकांची नावे सुचविली व त्यांचा थोडक्यात सारांश सांगितला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत छात्राध्यापिका समरीन काजी यांनी केले तर , प्रास्ताविक सबा मुजावर या छात्राध्यापिका ने केली. शेवटी श्वेता पाटील या विद्यार्थिनीने कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
. या कार्यक्रमासाठी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.